Sunday, June 4, 2023

बहिणीला घटस्पोट दिला म्हणून मेव्हण्याने पाडले दाजीचे दात

औरंगाबाद | तारांगण मिटमिटा येथील कुणाल कैलास गजहंस यांच्या साल्याने बहिणीला घटस्पोट दिला म्हणून फाइटरने दोन दात पाडल्याची घटना कर्णपुरा मैदानाजवळील बस स्टॉप येथे घडली आहे. शनिवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास मेव्हण्याने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, कन्नड तालुक्यातील विटखेडा येथील सचिन ज्ञानेश्वर दिवेकर हा त्याच्या तीन साथीदारांना सोबत घेऊन आला होता. त्याने कर्णपुरा मैदानाजवळ कुनाल याला बहिणीला घटस्पोट दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच हातातील फायटरने तोंडावर ठोसे लगावले यात कुणाल गजहंस यांचे दोन दात पडले आहे. या मारहाणीनंतर पुन्हा भेटल्यास आणखीन मारहान करेल अशी धमकीही दिली.

मारहाण केल्यानंतर आरोपी तिथून निघून गेले. कुणाल यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. त्यांनी उपचार घेतल्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात धाव घेऊन मेव्हण्याचा व इतर तीन जणांच्या विरोधात तक्रार केली आहे. छावणी पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस मुंडे हे करीत आहेत.