MGNREGA Name Changed : मनरेगाचे नाव केंद्र सरकार बदलणार; आता या नावाने ओळखली जाणार योजना

MGNREGA Name Changed
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MGNREGA Name Changed । देशातील सर्वात मोठी ग्रामीण रोजगार योजना असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे नामकरण करणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली. आता हि योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल. ग्रामीण रोजगार आणि विकासाला नवी दिशा देण्यासाठी हा बदल करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर, विधेयक संसदेत सादर केले जाईल. विधेयक मंजूर झाल्यानंतर हे बदल होतील.

मनरेगा अंतर्गत, ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्य कामाची मागणी करू शकतात. पंचायत स्तरावर रोजगार उपलब्ध करून दिला जातो. तलाव बांधणी, रस्ते दुरुस्ती, नाले खोदणे, बागकाम, मातीकाम आणि इतर सामुदायिक काम असे काम वेगवेगळे असते. ही योजना ग्रामीण भागात रोजगार आणि उपजीविकेच्या सुरक्षेचा एक प्रमुख स्रोत आहे. ग्रामीण भागात महागाई आणि नोकऱ्यांची कमतरता लक्षात घेऊन केंद्र सरकार कडून या कामाच्या दिवसांची संख्या १२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील गरीब कुटुंबाच्या हाताला जास्तीचे काम मिळेल, त्यांचे उत्पन्न वाढेल आणि वाढत्या स्थलांतराला आळा बसेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे सांगण्यात आले. MGNREGA Name Changed

प्रियांका गांधींचा संताप – MGNREGA Name Changed

केंद्र सरकारने मनरेगाचे नामांतर केल्यानंतर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मनरेगा योजनेचे नाव बदलण्याच्या निर्णयामागील तर्क समजत नाही. सर्वप्रथम, हे महात्मा गांधींच्या नावावर आहे आणि जेव्हा ते बदलले जाते तेव्हा सरकारी संसाधने पुन्हा खर्च होतात. कार्यालयीन साहित्यापासून ते स्टेशनरीपर्यंत सर्व काही नाव बदलावे लागते, ज्यामुळे ती एक मोठी आणि महागडी प्रक्रिया बनते. मग हे करण्याचा काय अर्थ आहे? असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला.