हुर्रे!ग्रीन,ऑरेंज झोनमधील नागरिकांच्या केसाला लागेल कात्री; सलून दुकानांना केंद्राची परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये ठप्प पडलेल्या उद्योग धंद्यांना पुन्हा सुरु करण्याची परवानगी आता केंद्रानं टप्पाटप्प्यानं द्यायला सुरुवात केली आहे. दारू विक्रीची दुकान आणि पान टपऱ्या सुरु करण्याची परवानगी दिल्यांनतर आता सलूनची दुकानं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं. येत्या ४ मे पासून सुरु होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलूनची दुकान सुरु होतील. या निर्णयानंतर आतापर्यंतच्या लॉकडाउनच्या कालावधीत वाढलेले केस आणि दाढीला वैतागलेल्या लोकांना दिलासा मिळाणार आहे. याव्यतिरीक्त इ-कॉमर्स कंपन्यांनाही या क्षेत्रात अत्यावश्यक सेवा व वस्तूंची विक्री करण्याची परवानगी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे.

दरम्यान, सलूनची दुकान केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये परवानगी देण्यात आलेली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं बंधनकारक असल्याचं गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे. रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment