Mhada Lottery 2024 | स्वतःच हक्काच घर असाव अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. परंतु शहरात येऊन स्वतःचं घर घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. कारण आजकाल फ्लॅटचे दर खूप जास्त वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाला फ्लॅट घेणे अजिबात परवडत नाही. यातच म्हाडा नागरिकांसाठी नेहमीच घरांची लॉटरी काढत असतात. अशातच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळा अंतर्गत तब्बल 2030 घरांसाठी लॉटरी काढण्यात आलेली आहे. म्हाडाने मुंबईतील अनेक ठिकाणांमध्ये ही लॉटरी जाहीर केलेली आहे. यामध्ये गोरेगाव पश्चिम, ऍटोला हिल, वडाळा कोपरी, पवई कन्नमवार नगर, विक्रोळी शिवधाम, कॉम्प्लेक्स मालाड, दादर, लोअर परळ यांसह विविध गटातील 2030 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे. या घरांपैकी जवळपास 370 घरांच्या किमती हे या 10 ते 25 टक्क्यांनी कमी केलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे.
म्हाडाने (Mhada Lottery 2024) विकासकाकडून मिळालेल्या जवळपास 370 घरांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये अत्यंत उत्पन्न गटातील लोकांच्या घराच्या किमती या 25 टक्क्यांनी कमी करणार आहे. तर अल्प उत्पन्न गटातील लोकांच्या घरांच्या किमती या 20 टक्क्यांनी कमी करणार आहे. तसेच मध्यम उत्पन्न गटातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी या घरांच्या किमती 15 टक्क्यांनी कमी करणार आहे. तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती या 10 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
ताडगावमध्ये उत्पन्न उच्च उत्पन्न गटात जी घरे येतात. त्या घरांची ओरिजनल किंमत ही 7.5 कोटी रुपये एवढी आहे. तर ती कमी करून 6 कोटी 75 लाख एवढी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दादर या ठिकाणातील अल्प उत्पन्न गटातील घराच्या खऱ्या किमती या 1 कोटी 62 लाख एवढ्या होत्या. तर त्या किमती आता 1 कोटी 30 लाख रुपये एवढ्या करण्यात आलेल्या आहेत. अंधेरी या ठिकाणी अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती या 1 कोटी 50 लाख होत्या. त्या कमी करून आता 1 कोटी १८ लाख रुपये एवढ्या करण्यात आलेले आहेत.
माझगाव या ठिकाणातील अल्प उत्पन्न गटातील घराच्या किमती या 62 लाख रुपये एवढ्या होता. तर त्या किमती कमी करून आता 50 लाख रुपये एवढ्या झालेल्या आहेत. सांताक्रुज येथील उत्पन्न गटातील घराच्या किमती या 72 लाख एवढ्या होत्या. त्या कमी करून आता 57 लाख रुपये एवढे करण्यात आलेले आहेत. विक्रोळीमध्ये घरांच्या किमती 86 लाख एवढ्या होत्या. त्या घराची किंमत 70 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे. कुर्ला येथे घराच्या किमती 88 लाख रुपये एवढ्या होतात तर ती कमी करून आता 71 लाख रुपये एवढे करण्यात आलेले आहे. तुम्हाला जर मुंबईमधील या ठिकाणांमध्ये घर घेण्याची इच्छा असेल, तर तुम्ही या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकता. म्हाडाच्या घरांची नोंदणीसाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतरच सोडतीची तारीख देखील जाहीर होणार आहे.