Tuesday, January 7, 2025

MHADA ची बंपर लॉटरी ; मुंबईत मिळणार स्वस्तात घरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे तिथे अनेक क्षेत्रातील लोक काम करताना दिसतात. कित्येक वर्ष या शहराच्या ठिकाणी राहिल्यानंतर आपल स्वतःच एक घर असावं , अस वाटत असत. पण घराच्या वाढत्या किंमती तसेच पगारातील तफावत यामुळे घर घेणं शक्य होत नाही. अशा लोकांसाठीच 2025 या नवीन वर्षाची हि बातमी महत्त्वाची ठरणार आहे. म्हाडा (MHADA) या वर्षी जवळपास 2500 ते 3000 घरांचे वाटप करणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. तर चला जाणून घेऊयात याबदल सविस्तर माहिती.

मोक्याच्या जाग्यावर कमी किंमतीत घर –

म्हाडा या शहराच्या ठिकाणी इमारती उभारणार असून , मोक्याच्या जाग्यावर तुम्हाला कमी किंमतीत घर घेता येणार आहे. ही घरे सायन, पवई, ताडदेव, विक्रोळी, घाटकोपर , बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जुहू , अंधेरी या ठिकाणी असणार आहेत. तसेच गोरेगाव इथ बांधल्या जाणाऱ्या घराचाही यामध्ये समावेश असणार आहे. त्यामुळे लोकांना मोक्याच्या जाग्यावर घर घेता येणार आहे.

घराची किंमत –

म्हाडाकडून ( Maharashtra Housing and Area Development Authority) वाटप केल्या जाणाऱ्या घराची सुरुवातीची किंमत 34 लाखापासून सुरू होणार आहे. पण काही दिवसांपासून ही किंमत 27 लाख करावी , अशी मागणी सर्वसामान्य लोक करताना दिसत आहेत. या मागणीवर सरकार कोणता निर्णय घेणार आहे , याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. लोकांची आशा आहे कि , सरकार यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेईल.

संगणकीय लॉटरीच्या माध्यमातून निवड –

म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण प्राधिकरणांकडून परवडणाऱ्या घरांसाठी अर्ज मागवले जातात. त्यानंतर संगणकीय लॉटरीच्या माध्यमातून पात्र अर्जदारांची निवड केली जाते. या प्रक्रियेत विशिष्ट उत्पन्न गटांसाठी, जसे की अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गट, घरे राखीव ठेवली जातात. सोडत ही प्रक्रिया पारदर्शक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी असल्यामुळे ती खूप महत्त्वाची मानली जाते. सोडत म्हणजे घरांच्या उपलब्ध जागेसाठी अर्जदारांची निवड करण्याची लॉटरी पद्धत होय .