हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची मोठी संधी मध्यमवर्गीयांसाठी चालून आली आहे. म्हाडा अंतर्गत तब्बल 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. हि लॉटरी कोकण विभागा अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. आजपासून, म्हणजेच 14 जुलै 2025 पासून या लॉटरी साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 ऑगस्ट 2025 आहे.
लॉटरी 5 घटकांमध्ये विभागण्यात आली – Mhada Lottery 2025
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.
१) २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका,
२) १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका,
३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, Mhada Lottery 2025
४) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
५) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लॉटरीसाठी (Mhada Lottery 2025) स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी साठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.
महत्वाच्या तारखा –
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख: 14 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत
प्रारूप पात्र अर्ज यादी: 21 ऑगस्ट 2025, संध्याकाळी 6:00 वाजता
दावे आणि हरकती सादर करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2025
अंतिम पात्र अर्ज यादी: 1 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 6:00 वाजता
दरम्यान, संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये असं आवाहन म्हाडा कडून करण्यात आलं आहे.




