हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Lottery । आपलं स्वतःच असं हक्काचं घर असावं असं सर्वानाच वाटते. खास करून शहरात असणाऱ्या नागरिकांना हक्काच्या घराची खूपच गरज असते. परंतु सध्याच्या महागाईच्या काळात घराच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे इच्छा असूनही घर खरेदी करणं सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर असते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही, कारण सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरी अंतर्गत अवघ्या ५ लाख रुपयांत तुम्हाला घर मिळू शकते. मात्र अल्प उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम उत्पन्न गटातील (MIG) लोकांनाच ५ लाखात घर खरेदीची संधी असणार आहे.
कोणत्या शहरात किती घरे ? MHADA Lottery
म्हाडाच्या लॉटरी (MHADA Lottery)अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे. नाशिकबाबत सांगायचं झाल्यास, नाशिकमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 12.68 लाख ते 13.55 लाख रुपयांत घरे उपलब्ध असणार आहेत. ही घरे वडाळा शिवारमधील पार्श्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी आहेत. तसेच अडगाव शिवारमधील प्रणव गार्डनमध्येही अल्प उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध असून त्यांची किंमत 11.94 लाख ते 15.31 लाख रुपये असणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको, सावेदी येथे 5.48 लाख रुपयांना घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील घरांबाबत सांगायचं झाल्यास, त्याठिकाणी 1351 घरे उपलब्ध आहेत. हि घरे प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा योजनेंतर्गत (MHADA Lottery) उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1148 घरे आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजना अंतर्गत 164 घरे उपलब्ध आहेत. तर 20% सर्वसमावेशक योजनेच्या माध्यमातून 39 घरांची खरेदी करता येईल. यामध्ये नक्षत्रवाडीमध्ये 1056 घरे असून त्यांची किंमत 15.30 लाख रुपये आहे. तर चिखलठाणामध्ये 158 घरे उपलब्ध त्याची किंमत 27 लाख रुपये आहे. देवळाई येथे 14 घरे असून त्यांची किंमत 13.19 लाख ते 16.19 लाख रुपये आहे. आनंद पार्कमध्ये 18 घरे असून ती 4.85 लाख ते 6.27 लाख रुपयांना उपलब्ध आहेत, तर चिखलठाणा येथे आणखी 6 घरे 34 लाख रुपयांना आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये 92 घरे असून त्याची किंमत 10.65 लाख रुपये आहेत.