Mhada Lottery Pune 2024 : सध्याच्या महागाईच्या काळात घराचं स्वप्न पूर्ण करणे म्हणजे सर्वसामान्य लोंकांसाठी काही साधी सुधी गोष्ट नाही. त्यातही पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये घरांचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत तुमच्या हक्कच्या घराचं स्वप्न म्हाडा म्हणजेच गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण पूर्ण करू शकते. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या (Mhada Lottery Pune 2024) आधीच पुणे विभागाची म्हाडाची सोडत प्रसिद्ध होणार आहे.
यावर्षीच्या मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5000 घरांसाठी (Mhada Lottery Pune 2024) म्हाडा सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती आहे. याचबरोबर म्हाडाची या वर्षातील ही पहिली सोडत ठरणार आहे. विशेष म्हणजे आचारसंहितेच्या अगोदरच ही जाहिरात येणार असल्याची माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
दरम्यान यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये झालेल्या सोडती मध्ये 20% योजनेअंतर्गत 2552 घरांपैकी 21 पात्र अर्जदारांना घरे देण्यात आली आहेत. त्यामधून म्हाडाला 14 कोटी 86 लाख रुपयांचे (Mhada Lottery Pune 2024) उत्पन्न मिळाले असल्याची माहिती आहे. याशिवाय उरलेल्या 3311 सदनिकांची प्रतिक्षा यादी कार्यान्वित करण्याचे काम सुरू आहे त्यातही कार्यवाही येतात दहा दिवसात होणार असल्याची माहिती अधिकारी पाटील यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी म्हणजे मागील वर्षी पुणे म्हाडा (Mhada Lottery Pune 2024) साठी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. सोडतीच्या तुलनेत सुमारे दहापटीने अर्ज प्राप्त झाले होते. तसेच म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याला गती देण्यात येत आहे अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच्या सोडतीदरम्यान दिली होती.