हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Mhada Mumbai Lottery 2025 – माहुल येथील 13 हजार रिक्त घरे महापालिका कर्मचाऱ्यांना मालकी तत्त्वावर विकली जाणार आहेत. म्हाडा बांधलेली ही घरे कालपर्यंत रिक्त होती, पण यापुढे त्या कर्मचाऱ्यांना साडेबारा लाख रुपयांच्या किमतीत विकली जाणार आहेत. या योजनेला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. सोमवारपासून (17 मार्चपासून ) ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 13 हजार घरांपैकी 9 हजार 98 घरांसाठी अर्ज भरण्याचा मार्ग खुला करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी 47 कर्मचाऱ्यांनी अर्ज भरले असून, त्यात 21 कर्मचाऱ्यांनी अनामत रक्कमही भरली आहे.
माहुल येथे विविध विकास प्रकल्प (Mhada Mumbai Lottery 2025) –
माहुल येथे विविध विकास प्रकल्पांमध्ये घरे देण्यात आलेल्या प्रकल्पबाधितांना या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात आले होते. पण , या ठिकाणी प्रदूषणामुळे इथे राहण्यास नागरिकांनी नकार दिला आहे. माहुलमध्ये विविध रासायनिक उद्योगांसह मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे, त्यामुळे या भागातील प्रदूषणाच्या समस्यांमुळे इथे राहण्यास लोकांनी विरोध केला. यामध्ये आरसीएफ, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, टाटा पॉवर, इंडियन ऑईल, ओएनजीसी आणि एजिस लॉजिस्टिक्स यासारख्या कंपन्यांच्या रासायनिक कारखान्यांमुळे नागरिकांची आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या . अनेकांना दमा, टीबी आणि इतर श्वसनाच्या समस्या निर्माण झाल्यामुळे या घरांमध्ये रहाण्याबाबत प्रकल्पबाधितांची नाराजी होती.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया –
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 एप्रिल आहे. लॉटरी पद्धतीनुसार (Mhada Mumbai Lottery 2025) घरांचे वितरण 16 एप्रिलला करण्यात येणार असून, त्यानंतर पूर्ण रक्कम भरण्याची अंतिम तारीख 12 ऑक्टोबर आहे. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घरं खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भविष्यात यासाठी आणखी अर्ज भरण्याची अपेक्षा आहे.