हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Nashik Lottery 2025 । सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात मस्त घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाकडून नाशिककरांना आनंदाची बातमी आहे. म्हाडाने म्हाडा नाशिक मंडळाने 478 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यासाठी मंडळाकडून अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या 478 घरांच्या शुभारंभ म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते वांद्रे येथील मुख्यालयात झाला. त्यामुळे नाशिककराना कमी पैशात घरे खरेदी करता येणार आहे.
कोणत्या भागात घरे मिळणार? MHADA Nashik Lottery 2025
म्हाडा नाशिक मंडळातर्फे जाहीर झालेल्या या सोडतीत नाशिक शहर व परिसरातील गंगापूर शिवार, देवळाली शिवार, पाथर्डी शिवार, म्हसरुळ शिवार, आगर टाकळी शिवार आणि नाशिक शिवार या भागांमध्ये घरे उपलब्ध आहेत. यामध्ये देवळाली शिवारात २२ सदनिका, गंगापूर शिवारात ५० सदनिका, पाथर्डी शिवार ६४ सदनिका, म्हसरुळ शिवार १९६ सदनिका, नाशिक शिवार १४ सदनिका, आगर टाकळी शिवार १३२ सदनिका तर नाशिक शिवारात १४ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (MHADA Nashik Lottery 2025)
अर्ज करण्याची प्रक्रिया व अंतिम मुदत :
सोडतीसाठी दिनांक ०४ सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. दिनांक ०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेची स्वीकृती केली जाणार आहे. यानंतर ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. MHADA Nashik Lottery 2025
याबाबत म्हाडाने स्पष्ट केले आहे की या नाशिक महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या या सोडतीसाठी कोणतेही प्रतिनिधी, एजंट किंवा सल्लागार नेमलेले नाहीत. अर्जदारांनी फसवणूक टाळण्यासाठी थेट https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडा लॉटरी ॲपवरूनच अर्ज करावा.




