MHADA Pune Lottery : पुणेकरांना मिळणार स्वस्तात घरे; म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी जाहीर

MHADA Pune Lottery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MHADA Pune Lottery । शिक्षणाचे माहेरघर आणि नोकरीसाठीचे बेस्ट ठिकाण म्हणून नावलौकिक असणाऱ्या पुण्यात आपलं हक्काचं घर असावं अशी अनेकांची इच्छा असते. परंतु आजकाल घरांच्या किमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत कि सर्वसामान्य माणसाला मुंबई पुण्यासारख्या शहरात घर खरेदी करणं म्हणजे कधीही पूर्ण होणाऱ्या स्वप्नासारखं झालं आहे. परंतु आता चिंता करू नका. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने (MHADA) पुणेकरांसाठी 4186 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आज 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे पुणेकरांचे हक्काचे घर घेण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

कोणत्या प्रकल्पात किती घरे ? MHADA Pune Lottery

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या भव्य सोडतीची (MHADA Pune Lottery) घोषणा केली आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २१९ घरे आहे. म्हाडा गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्गत १६८३ घरे आहे. तर ८६४ घरे हा सामाजिक गृहनिर्माण प्रकल्पाअंतर्त बांधली जाणार आहे. 20% सर्वसमावेशक गृहयोजनेत 3322 घरे उपलब्ध आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात आज 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्यासही आजपासूनच सुरुवात होणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:55 पर्यंत असेल. अनामत रक्कम ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत ठेवण्यात आली आहे. जे इच्छुक अर्जदार बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धतीने रक्कम भरतील त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेतच पैसे भरावेत.

या प्राथमिक यादीवर (MHADA Pune Lottery) दावे किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाईल. पुण्यातील या घरांची सोडत २१ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. तुम्ही २१ नोव्हेंबररोजी संध्याकाळी ६ वाजता वेबसाइटवर जाऊन लॉटरीची माहिती मिळवू शकतात. यावरुन तुम्हाला कोणाला घरे मिळाली याची माहिती मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोयीसाठी अर्जदारांनी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी. नोंदणी करताना, अर्ज भरताना आणि अनामत रक्कम भरत असताना सदर अर्जदारांनी खात्री करावी तसेच वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे असं आवाहन म्हाडा कडून करण्यात आलं आहे.