व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

म्हसवड- मायणी रस्त्यावर कार व दुचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार

दहिवडी | म्हसवड-मायणी रस्त्यावर दिडवाघवाडी (ता. माण) येथे कार व दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला. तर एकजण जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 7.30 सुमारास झाला. बापू बाबा पुकळे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, सोमवारी सकाळच्या सुमारास बापू बाबा पुकळे हे दुचाकीने विरकरवाडीवरुन- पुकळेवाडीकडे निघाले होते. दरम्यान, कार चालक सुमित बाळासाहेब पाटोळे (रा. भैरवनाथ पार्क कळंबा, ता. करवीर जि. कोल्हापूर) (एमएच ०५ सीए १७१८) हे कारने मायणीवरुन म्हसवडच्या दिशेने येत होते. यावेळी दुचाकी व कारची समोरासमोर जोराची धडक झाली.

या धडकेमध्ये दुचाकी चालक बापू पुकळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रोशन उत्तम पुकळे (दोघे रा. पुकळेवाडी ता. माण) हे गंभीर जखमी झाले. या घटनेची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात प्रविण मच्छिंद्र हुबाले यांनी दिली. म्हसवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.