बहुप्रतिक्षित ‘म्होरक्या’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पहा फक्त एका क्लिकवर..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | उध्वस्त आयुष्याची, इस्कटलेल्या व्यवस्थेची लांबी-रुंदी आणि खोली काही सेकंदातच सांगणारा म्होरक्या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी संध्याकाळी रिलीज झाला आहे. राजश्री प्रोडक्शनने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे. ग्रामीण ढंगाचा पुरेपूर वापर केलेला हा चित्रपट नेतृत्व करु इच्छिणाऱ्या मेंढपाळ मुलाच्या जीवनावर आधारित असून चित्रपटाच्या गाण्यांतून चित्रपट लोकांपर्यंत पोहचवला जात आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी लिंक –

महाराष्ट्रात हा चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाला याआधीच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमर भारत देवकर यांनी केलं आहे.

#MhorkyaTrailer #Mhorkya
#NationalAwardWinner #MarathiFilm

You might also like