MI vs RCB Pitch Report : वानखेडेवर आज रोहित VS विराट; पीच रिपोर्ट काय सांगतेय?

MI vs RCB Pitch Report
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

MI vs RCB Pitch Report : आयपीएल २०२५ मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्या हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला असून रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटचे २ अनमोल हिरे आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघाने आपले मागचे सामने गमावले असल्याने आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोघेही प्रयत्नशील असतील… आजच्या सामन्यात फलंदाजांची धुळवड बघायला मिळणार कि गोलंदाज आपला करिष्मा दाखवणार यावर दोन्ही संघाचा विजय अवलंबून आहे. त्यासाठी वानखेडे स्टेडियमचे पीच कस आहे? ते आधी जाणून घ्यावं लागेल.

पीच रिपोर्ट काय सांगतेय?- MI vs RCB Pitch Report

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे आणि या खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतात. वानखेडेच्या सीमारेषा सुद्धा अगदी छोट्या असल्याने चौकार- षटकारांची आतषबाजी होईल. त्यामुळे आजचा सामना हाय स्कोरिंग होण्याची शक्यता आहे. वानखेडेची खेळपट्टी उसळी देते (MI vs RCB Pitch Report) त्यामुळे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला विकेट मिळू शकतात… परंतु जस जस खेळ पुढे जात राहील तस तस फलंदाजी करणं सोप्प होईल. एकदा का फलंदाज सेट झाला कि मग शॉट खेळने सोप्प जाईल…. मैदानावर दव पडण्याची शक्यता असल्याने कोणताही संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. वानखेडे स्टेडियमवरचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर रन चेस करणं हे सोप्प जाते…

खास करून मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना जिंकणं गरजेचं आहे. मुंबईचा खेळ यंदा अतिशय निराशाजनक राहिलाय. मुंबईने आत्तापर्यंत ४ सामन्यात केवळ १ विजय मिळवला आहे. पॉईंट टेबल मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माचा खराब फॉर्म मुंबईसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्याचप्रमाणे जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती मुंबईला प्रत्येक सामन्यात जाणवतेय… डेथ ओव्हर मध्ये मुंबईचे गोलंदाज खोऱ्याने धावा देतायत… आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर फक्त रोहित शर्माचं नव्हे तर रेयान रिकुल्टन, हार्दिक पंड्या, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव यांनाही आपला खेळ दाखवावा लागेल.

आरसीबीबाबत सांगायचं झाल्यास.. सध्या हा संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली तुफान फॉर्मात आहे… बंगळुरूने यंदा चेन्नई सुपर किंग्जचा १८ वर्षांनंतर चेपॉकवर पराभव केला. विराट कोहली, रजत पाटीदार, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, लाईम लिविंगस्टोन अशी मजबूत फलंदाजी आरसीबीकडे आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, जोश हेझलवूड आणि यश दयाल यांना वानखेडेवर मदत मिळू शकते . कृणाल पांड्या सुद्धा अनेक वर्ष वानखेडेवर खेळला आहे.. त्यालाही मैदानाची पुरेपूर जाण आहे. त्यामुळे आरसीबीने मुंबईला आज हरवल तर आश्चर्य वाटायला नको.