मुंबई | माजी पॉर्न स्टार मिया खलिफा तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड अवतार तसेच तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. ती आपली मते मांडण्यास कधीही मागेपुढे पाहत नाही आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडते. मग प्रकरण कितीही कटू असले तरी. अलीकडेच मिया खलिफाने आपल्या नाकावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला आहे.
तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांसोबत ही गोष्ट शेअर केली होती आणि आता मियाने आणखी एक खुलासा केला आहे. खरं तर, मियाने नुकतेच आर्मपिटसाठी घेतलेल्या बोटॉक्स ट्रीटमेंट बाबतचा खुलासा केला आहे. मिया खलिफाने नुकतेच तिच्या आर्मपिटसाठी बोटॉक्स इंजेक्शन घेतले.
तिने तिच्या इन्स्टा स्टोरीद्वारे ही गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे आणि त्याची प्रोसेस देखील शेअर केली आहे, मियाने तिच्या पोस्टद्वारे आर्मपिटमध्ये बोटॉक्स घेण्याचे कारण देखील सांगितले आहे.
मियाच्या पोस्टनुसार, जास्त घाम येत असल्याने तिने ही ट्रीटमेंट घेतली आहे. मियाने आपल्या चाहत्यांना सांगितले की ती ‘Hyperhidrosis’ (अति घाम येण्याची समस्या) या आजाराशी झुंज देत आहे. त्यामुळेच त्यांनी बोटॉक्स ट्रीटमेंटचा अवलंब केला.
यापूर्वीही मियाने तिच्या नाकावर शस्त्रक्रिया झाल्याचा खुलासा केला होता. त्याचे लांब नाक योग्य आकारात आणण्यासाठी तिने नाकाची शस्त्रक्रिया केली होती. ज्याचे प्रत्येक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत होती.