हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या T 20 सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. इंग्लंडने भारतीय संघाला विजयासाठी 165 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान टीम इंडियाने 3 विकेट्सच्या मोबदल्यात 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण करत मागच्या परभवाचा वचपा काढला. सलामीवीर ईशान किशन आणि कर्णधार विराट कोहली हे सामन्याचे हिरो ठरले.
दरम्यान ईशान किशनच्या धडाकेबाज खेळी नंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने पुन्हा एकदा टीम इंडियाला डिवचले, ‘मी आधीच म्हणालो होतो मुंबई इंडियन्सचा संघ टीम इंडियापेक्षा चांगला आहे’, असं म्हणत भारतीय संघाला आणि बीसीसीआयला टोमणा मारलाय.
Told you all the @mipaltan were better than India … What a debut @ishankishan51 !! #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
यापूर्वी भारतीय संघाचा पहिल्या सामन्यात दारुण पराभव झाल्यानंतर मायकल वॉनने, ‘या भारतीय संघापेक्षा मुंबई इंडियन्सचा संघ खूप चांगलाय’ असं ट्विट केलं होतं. त्यावेळी त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते.