मायक्रोसॉफ्टने केली मोठी घोषणा ! जगभरातील सर्व स्टोअर्स होणार बंद,आता मिळणार फक्त ऑनलाइन सर्व्हिस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी जाहीर केले की, ते जगभरातील सर्व 83 रिटेल स्टोअर्सना कायमचे बंद करत आहेत. कंपनीने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, आता त्यांचे लक्ष ऑनलाइन स्टोअर्सवर असणार आहे, त्यांचे सर्व रिटेल स्टोअर्स आता बंद होतील, फक्त चार स्टोअर्स तेवढे खुले राहतील जिथे यापुढे कुठलेही प्रोडक्टस विकले जाणार नाही. हे चार स्टोअर्स आता केवळ एक्सपेरियंस सेंटर म्हणून वापरले जात आहेत.

त्यांच्या टेक्नोलॉजीचे जाळे हे जगभरात पसरल्यामुळे ऑनलाईन व्यवसायाला चांगला फायदा झाला आहे. कंपनीने म्हटले आहे की, मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यापासून आमच्या ऑनलाईन विक्रीत आता वाढ झाली आहे तसेच आमची टीम ही रिटेल स्टोअर्स पेक्षा वर्चुअली चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा देत आहे.

ग्राहकांच्या सोयीसाठी ट्रेनिंग देईल
कंपनीने असे म्हटले आहे की, या बदललेल्या परिस्थितीत Microsoft.com या डिजिटल स्टोअरवर लक्ष केंद्रित केले जाईल आणि गुंतवणूकीही सुरू ठेवेल. याव्यतिरिक्त, रिटेल टीम लोकांना सेल्स आणि स्पोर्ट साठी ट्रेनिंग देईल, जेणेकरून ग्राहक पूर्वीप्रमाणेच सेवेचा अनुभव घेतील. आमच्या टीम मधील लोकांना 120 हून अधिक भाषांचे ज्ञान आहे. ज्याद्वारे त्यांना जगातील कोणत्याही कोपऱ्यातील ग्राहकांशी सहजपणे संवाद साधता येतो.

190 देशांमध्ये पसरलेले आहे जाळे
मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स आणि विंडोजच्या माध्यमातून दरमहा 190 देशांमधील 1.2 अब्ज लोकांपर्यंत बाजारपेठ पोहोचली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष डेव्हिड पोर्टर म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी ऑनलाइन विक्री वाढली आहे. आमच्या पोर्टफोलिओमध्ये बहुतेक डिजिटल प्रॉडक्ट्स असतात. आमच्या टीमने उत्कृष्ट काम केले आहे आणि प्रत्यक्ष ठिकाणी न जाताही ग्राहकांना कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment