हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Mihos Electric Scooter) वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रँड जॉय ई-बाईकने नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये आपली इलेक्ट्रिक स्कुटर Mihos लाँच केली होती. आता कंपनीने या हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग सुद्धा अधिकृतपणे जाहीर केले आहे.
1.49 लाख रुपये किंमत-
येत्या 22 जानेवारीपासून या स्कूटरची बुकिंग अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे करता येईल. विशेष म्हणजे, या स्कुटरचे बुकिंग तुम्ही अगदी मोफत मध्ये म्हणजे 1 पैसाही खर्च न करता करू शकणार आहात. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.49 लाख रुपये ठेवली आहे. मात्र, पहिल्या 5 हजार ग्राहकांनाच या किमतीत हि स्कुटर खरेदी करता येणार आहे. यानंतर कंपनी स्कूटरच्या एक्स-शोरूम किंमतीत बदल करू शकते.
100 किलोमीटरपर्यंत रेंज- (Mihos Electric Scooter)
MIHOS मध्ये, कंपनीने 2.5 kWh क्षमतेचा Li-Ion बॅटरी पॅक वापरला आहे. ही बॅटरी चार्ज होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागतो. (Mihos Electric Scooter) एकदा फुल्ल चार्ज केल्यांनतर ही इलेक्ट्रिक स्कुटर एका चार्जमध्ये 100 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. MIHOS इलेक्ट्रिक स्कुटरचे टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. तर शून्य ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त सात सेकंद लागतात.
अन्य फीचर्स –
फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, (Mihos Electric Scooter) या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी, रिमोट अॅप, रिव्हर्स मोड, जीपीएस, साइड स्टँड सेन्सर, अँटी थेफ्ट, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. याशिवाय समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे.