मायलेकराचा मृत्यू : शिंगणापूर घाटात 400 फूट खोल दरीत कार कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फुट खोल दरीत कार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील मायलेकरांचा मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय- 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय- 75) अशी मृत आई व मुलांचे नाव आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सध्या नाशिक येथे महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी सोमवारी सकाळी गावी आलेले होते. आज सकाळी गजानन वावरे व त्यांची वृद्ध आई हे दोघेजण पुन्हा नाशिककडे जात होते. पण शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फूट खोल दरीत त्‍यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला.

घाटात घटनास्थळी बचावकार्य हाती घेण्यात आले होते. शिंगणापूर येथील ट्रेकर्स ग्रुप व युवकांनी 400 फूट खोल दरीतून मृतदेहवर काढले. या भीषण अपघात मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Leave a Comment