मिलिंद नार्वेकरांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी निवड; उद्धव ठाकरेंच्या एका फोनने केली कमाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले शिलेदार मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. या नियुक्तीसाठी स्वत: उद्धव ठाकरेंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना फोन केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्यपद देण्यात आलं आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर-

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. साधारण १९९४ साली मिलिंद नार्वेकर रितसर उद्धव ठाकरे यांचे पीए बनले. त्यानंतर आजतागायत उद्धव ठाकरे यांची सावली बनून मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत कायम असतात. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

Leave a Comment