हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपरमॉडेल मिलिंद सोमण यांनी अलीकडेच आपल्या ‘मेड इन इंडिया’ या पुस्तकाचा एक भाग इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यात त्याने आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याविषयी भाष्य केले आहे. मिलिंदच्या या पोस्टवरून असे दिसते की,त्यांच्या वडीलांबरोबरील नाते खूप ताणलेले होते. मिलिंद याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे की वडिलांशी त्याचा जास्त संबंध नव्हता.
आपल्या पोस्टची सुरूवात करताना मिलिंद यांनी लिहिले, “१९९५ हे माझ्यासाठी खूप महत्वाचे वर्ष होते. त्यावर्षी जानेवारीत वडिलांचा मृत्यू झाला, त्यानंतर मी भावनांच्या जाळ्यात अडकलो, परंतु त्यांच्या मृत्यूबद्दल मला फारसे वाईट वाटले नाही,कारण मला त्यांच्याबद्दल प्रेम कधीच नव्हतं जे कुठेतरी खूप चुकीचे आहे कारण ते त्यांच्या पध्दतीने माझी खूप काळजी घेत असे. मला आठवते, जेव्हा मृत्यूच्या ५ वर्षांआधी त्यांनी घर सोडले, तेव्हा मला खूपच हलके वाटले. जेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतुन रुग्णालयात नेण्यात आले होते आणि मी त्याच्याबरोबर बसलो होतो तेव्हा मी त्यांच्याबद्दल प्रेमभाव आणण्याचा प्रयत्न केला पण त्यात मला यश आले नाही.
मिलिंद यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या परंतु फार आनंदी धड्याचा हा शेवट होता. तथापि, सुदैवाने मी लवकरच त्यांचा मृत्यू स्वीकारला आणि माझे मन शांत केले. माझ्या वडिलांच्या निधनानंतर “मेड इन इंडिया” हा म्युझिक व्हिडिओ रिलीज करण्यात आला. या एकाच व्हिडिओमुळे गायक, बेबी डॉल अलिशा चिनॉय संगीत जगातात प्रसिद्ध झाली आणि मला एक सुपर मॉडल मधून एक मोठा स्टार बनायची संधी मिळाली. ”
मिलिंद यांचे हे पोस्ट वाचल्यानंतर त्यांचे चाहते खूप भावूक झाले. त्याच्या पोस्टवर भाष्य करताना एका वापरकर्त्याने लिहिले की, “आपण हे लिहिले आहे … मनापासून बोलल्याबद्दल धन्यवाद” त्याच वेळी, दुसर्याने लिहिले, ” स्वतःची चूक जाणून त्यावर बोलायला खूप धैर्य लागते”.