हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजपासून भारत आणि चीन यांचे मिलिटरी कमांडर सीमाप्रश्न विषयी समोरा-समोर बसून चर्चा करतील. यापूर्वी उभय देशांच्या मिलिटरी कमांडरमध्ये 6 नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली होती. दोन्ही देशांनी सीमा भागामध्ये 50-50 हजार सैनिक तैनात केले आहेत. तनाव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. तणाव वाढल्यानंतर दोन्ही देशांनी सीमेवर रणगाडे आणि हत्यारबंद सैनिकही तैनात केले होते.
अडीच महिन्यानंतर आज परत एकदा भारत आणि चीनचे मिलिटरी कमांडर एकमेकांसोबत चर्चा करतील. या चर्चेमध्ये लदाख मधील एलएसीवर असलेल्या तणावा संदर्भात चर्चा होईल. या ठिकाणी मे 2020 पासून हजारो सैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. XIV कॉर्पस कमांडर लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन आणि दक्षिण शिंजियांग मिलिटरी क्षेत्राचे कमांडर मेजर जनरल लियू लिन यांच्यामध्ये ही बैठक होईल. दोन्ही कमांडरमध्ये होणारी बैठक ही एलएसीच्या जवळ चीन कडील चुंशुल या भागात होईल.
वरील बैठक ही भारताकडून चीनला पाठवलेल्या मेमो वर आलेल्या उत्तरानंतर घेतली जाणार आहे. दोन्ही सैन्यांचे 50-50 हजार सैनिक या भागांमध्ये तैनात केले गेले आहे. कुठलीही अनपेक्षित गोष्ट घडू नये, या उद्देशाने ही बैठक असेल. असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. भारताने नुकतेच दोन चिनी सैनिकांना सीमेपलीकडे पाठवले आहे. जे रस्ता चुकून भारतीय सीमेमध्ये आले होते. विदेश मंत्रालयाचे एक प्रतिनिधीही या बैठकीमध्ये सामील असतील. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये शेवटची डिप्लोमॅटिक चर्चा ही 18 डिसेंबर रोजी झाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.