2020 मध्ये जगातील लष्करी खर्च सुमारे 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला, भारत कितव्या क्रमांकावर आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोणत्याही देशाची शक्ती त्याच्या लष्करी सामर्थ्याने मोजली जाते. ज्या देशाची सैनिकी ताकद अधिक मजबूत, तो देश अधिक सामर्थ्यवान असल्याचे म्हटले जाते. हेच कारण आहे की, जगभरातील सर्व देश त्यांच्या सैनिकी सामर्थ्यावर बरेच पैसे खर्च करतात, ज्यामध्ये त्यांना आधुनिक शस्त्रे (Arms) आणि तंत्रज्ञानाने (technology) सुसज्ज केले जाऊ शकतात. अमेरिका (America) आत्ताच जगातील सर्वात शक्तिशाली देश असल्याचे म्हटले जाते कारण त्यांच्याकडे असलेली आधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान इतर कोणत्याही देशाकडे नाही. तथापि, कोणता देश आपल्या लष्करी खर्चासाठी किती पैसे खर्च करतो याबाबत स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (Stockholm International Peace Research Institute (SIPRI) ने एक रिपोर्ट सादर आहे, त्यानुसार सन 2020 मध्ये जगातील लष्करी खर्च 1,981 अब्ज डॉलर होता, जो 2019 च्या तुलनेत जास्त 2.6 टक्के आहे.

SIPRI ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” कोविड -19 या साथीच्या आजारामुळे जागतिक जीडीपी (global gross domestic product) 4.4 टक्क्यांनी घसरले तेव्हा एका वर्षात जगातील लष्करी खर्चात 2.6 टक्के वाढ झाली.

भारत या क्रमांकावर आहे
SIPRI च्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये संपूर्ण जगामध्ये सैन्यावर 1,981 अब्ज डॉलर्स खर्च झाले, जे 1988 नंतर सर्वात जास्त आहे. सन 2020 मध्ये, जगभरातील लष्करी खर्चापैकी 3.7% वाटा भारताचा आहे, जो अमेरिका आणि चीन चीननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2020 मध्ये अमेरिका, चीन, भारत, रशिया आणि इंग्लंड टॉप मिलिटरी स्पेंडर करणारे देश ठरले आहेत. जगातील एकूण लष्करी खर्चापैकी 62 टक्के या देशांचा आहे.

भारताचा लष्करी खर्च वाढल्यामुळे चीन आणि पाकिस्तान चिंतेत
2019 च्या तुलनेत 2020 मधील लष्करी खर्च 2 टक्के जास्त होता. 2020 मध्ये भारताचा (India) लष्करी खर्च 72.9 अब्ज डॉलर्स होता. SIPRI ने आपल्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे की,”भारताच्या या वाढत्या लष्करी खर्चाचे मुख्य कारण म्हणजे अलीकडच्या काळात चीन आणि पाकिस्तान बरोबरीला वाढता तणाव.”

एकटी अमेरिका इतका खर्च करते
अमेरिका जगातील सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश आहे. 2020 मध्ये जगातील लष्करी खर्चांपैकी एकट्या अमेरिकेचा हिस्सा 39 टक्के आहे. 2020 मध्ये अमेरिकेच्या लष्करी खर्चाने अंदाजे 778 अब्ज डॉलर्स गाठले आहेत, जे 2019 च्या तुलनेत 4.4 टक्के जास्त आहेत. 7 वर्षांच्या निरंतर घटानंतर अमेरिकेच्या लष्करी खर्चात सलग 3 वर्षे वाढ दिसून येत आहे.

चीनही यात मागे नाही
लष्करी खर्चाच्या बाबतीत चीनने 2020 मध्ये दुसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले. 2020 मध्ये त्याचा लष्करी खर्च 252 अब्ज डॉलर्स झाला आहे. SIPRI च्या लष्करी खर्चाच्या डेटाबेसच्या मते, गेल्या 26 वर्षांपासून चीनचा लष्करी खर्च वाढत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment