मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समिती समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. तसेच कर्नाटक सरकाराच्या निषेधाची घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, विलास देसाई, संतोष माने, विवेक शेटे, मुस्तफा बुजरूक, बाळासाहेब पाटील यांच्यासह असंख्य सदस्य उपस्थित होते.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे विटंबना कृत्याचे पडसाद मिरज शहरात उमटत आहेत. मिरज शहरात मिरज शहर सुधार समितीच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करून शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धअभिषक घालण्यात आले. कर्नाटकाची राजधानी बेंगलोर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना कन्नडिगा गुंडांनी केली. याचे संतप्त पडसाद मिरजेतही उमटत आहेत.

मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समितीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कर्नाटक सरकाराच्या निषेधाची घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. दुग्धाभिषेक घालण्यात आले. यावेळी असिफ निपणीकर, किरण भुजगडे, विजय धुमाळ, शाहिद सतारमेकर, अक्षय वाघमारे, राकेश तामगावे, सुहास कापसे, सौ. गीतांजली पाटील, रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. प्रमोद इनामदार, अल्ताफ रोहिले, इकबाल भालदार यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment