हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज काल महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या महागाईमुळे जनसामान्य लोकांचे हाल होत असून महागाईने सर्वसामान्य लोकांचे अक्षरशः कंबरडे मोडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याच्या वाढलेल्या किमती पाहता जनसामान्य लोकांच्या खानपानामध्ये पालेभाज्या कमी झाल्या असून आता लवकरच सर्वसामान्य जनतेला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात जीवनावश्यक पदार्थ असलेल्या दुधाच्या किमतीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मिळालेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही दिवसांमध्ये दुधाचे भाव पाच टक्क्यांनी वाढणार आहे. नुकतच भाजीपाल्याचे भाव वाढल्यामुळे सर्व ठिकाणी नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामध्येच आता दुधाचे वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी देखील दुधाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते. जुलै महिन्यामध्ये भाजीपाल्यासह डाळींचे देखील भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रिझर्व बँकेच्या वरच्या सीमेपेक्षा दीड दोन वर्षापासून जास्त प्रमाणात किरकोळ महागाई सुरू आहे. जुलै महिन्यामध्ये ही महागाई 4.49 टक्के आहे तर यापूर्वी जून महिन्यामध्ये ही महागाई 4.25% होती.
गेल्या काही दिवसापासून टोमॅटो , मिरची, भाजीपाल्याचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी टमाटरचे भाव 250 रुपये किलो तर मिरचीचे भाव 200 रुपये किलो सुरू होते. एवढेच नाही तर हिरव्या पालेभाज्यांसह गरम मसाला आणि जिऱ्याच्या किमती देखील गगनाला भिडल्या आहे. आता दुधाचे भाव वाढणार असल्यामुळे जनसामान्य लोकांचा खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसत आहे. गेल्या १० वर्षांपासून दुधाच्या किमतींमध्ये मोठी दरवाढ सुरू आहे. तर मागील तीन वर्षांपासून दुधाच्या दरात 22 टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. कोरोना महामारीनंतर दुधाच्या किमती झपाट्याने वाढताना दिसत आहेत.