Milk Producing Farmers Subsidy | नुकतेच काही दिवसापूर्वी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी राज्यातील अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात बोलताना अजित पवार म्हणाले होते की, राज्याचे आर्थिक स्थिती चांगली आहे. त्यामुळे आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद आता.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या महसूल उत्पन्न वाढीसाठी उपाय योजना करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त पाळताना नको असलेल्या खर्च टाळण्यात येत आहे. अशा प्रकारच्या उपाययोजना आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्य पुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीरित्या मात केली जाईल. (Milk Producing Farmers Subsidy)
राज्यातील देवस्थानांसाठी महत्वाचा निर्णय
यापुढे अजित पवार म्हणाले की, राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे. संपूर्ण राज्यातून भाविक कोल्हापूरमधील जोतिबा देवस्थानला भेट देऊन दर्शन घेत असतात. इथल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जोतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असण्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पहिली समिती पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती उच्च अधिकार समिती आणि शिखर समितीच्या मान्यतेबाबतची कार्यवाही सुद्धा लवकरात लवकर करण्यात येणार असल्याचा त्यांनी सांगितलेला आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय | Milk Producing Farmers Subsidy
अजित पवार यांनी शेतकऱ्यांबाबत आणि दूध उत्पादकांबाबत देखील काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति लिटर 5 रुपयांचा अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यात प्रतिदिन 1 कोटी 60 लाख लिटर दूध संकलन होत, असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी 283 कोटींची आवश्यकता आहे.(Milk Producing Farmers Subsidy) यापैकी 204 कोटींची निधी पुरवणी मागणी द्वारे किंवा उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.
त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आशा सेविकांना मानधन, निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेले शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा, नमो शेतकरी सन्मान निधी योजना, गोरगरीब लोकांना आनंदाचा शिधा अशा अनेक महत्त्वकांक्षी योजनांच्या निधीची देखील तरतूद केलेली आहे.