Amazon ची फ्रेंचायसी घेऊन पैसा कमवा.. असं म्हणत लाखोंना लुबाडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी देतो त्यातून वस्तूंची ऑफलाईन तसेच ऑनलाईन विक्री करून 18 टक्के, 12 टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाला 4 लाख 97 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अब्दुल रेहमान आणि आलोक अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या बाबत पोपट उमेश गुंजाळ यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.आहे. त्यानुसार, आरोपीनी फिर्यादीस अॅमेझॉन ई स्टोअरची फ्रैंचाइसी घेवून विक्रीसाठी ज्या वस्तू असतात त्या तुम्ही ऑफलाईन तसेच ऑनलाईन पध्दतीने ग्राहकांना विकू शकता. त्यात तुम्हाला 18 टकके, 12 टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवले.

त्यासाठी रजिस्ट्रेशन फी 15 हजार रूपये, अॅग्रीमेंट करण्यासाठी 38 हजार रूपये, सेटलमेंट अकाऊंट ओपनिंगसाठी 85 हजार रूपये मिनी फ्रँचायसी फी करिता 1 लाख 55 हजार रूपये, ट्रान्स्पोर्टिंगसाठी 94 हजार रूपये व जीएसटी साठी 1 लाख 8 हजार रूपये असे एकूण 4 लाख 97 हजार 100 रुपये अशी रक्कम लाटण्यात आली. ही सर्व रक्कम ही ऑनलाईन पद्धतीने देण्यात आली. सदर प्रकरणात आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.