‘मुस्लिमांची अवस्था लग्नातल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी’ – असदुद्दीन ओवेसी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात असलेल्या पक्षातील काही पक्षांची अवस्था हि बिकट बनली आहे. अशात पक्षांतील श्रेष्टींकडून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. देशातील महत्वाचा पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. देशात सध्या मुस्लिमांची अवस्था हि लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक जातीकडे त्यांचा नेता आहे. मात्र, मुस्लिमांकडे नाही, असे ओवेसी यांनी म्हंटले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून तयारी करण्यात आलेली आहे. दरम्यान पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी अयोध्येतून प्रचार मोहिमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 403 जागांपैकी 100 जागांवर आपले उमेदवार असणार आहेत. देशात सध्या मुस्लिमांची अवस्था हि लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली आहे. पण आता मुस्लीम वाद्यं वाजवणार नाहीत.

उत्तर प्रदेशात एमआयएमच्या वतीने आगामी विधान सभा निवडणुकीसाठी तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात 19 टक्के मुस्लीम लोकसंख्या असूनही एकही नेता नाही. त्यामुळे एमआयएमने आता या ठिकाणी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे.

Leave a Comment