मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये पसरलीय धुक्यांची झालर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये हिवाळा असो किंवा पावसाळा अशा प्रत्येक ऋतूत पर्यटकांकडून मोठ्या संख्येने गर्दी केली जाते. यंदाही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे पावसामुळे निर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी सध्या दात धुके पसरले आहेत. शनिवार व रविवारी या ठिकाणी पर्यटकांना येण्यास बंदी घेतली असली तरी सोमवारपासून पर्यटकांना येथील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता येणार आहे.

लहान लहान धबधब्यातूनफेसाळणारे पाणी, रिमझिमपणे कोसळणारा पाऊस, सर्वत्र पसरलेले दाट धुके असे गुलाबी वातावरण सध्या महाबळेश्वर या ठिकाणी निर्माण झाले आहे. पावसाळ्यात महाबळेश्वरचे वातावरण काही वेगळेच असते. येथील निसर्गरम्य वातावरणामुळेच अनेक हिंदी व मराठी चित्रपटांतील गाण्यांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चित्रिकरण केले जाते. सध्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्यांची झालर निर्माण झाली आहे.

सध्या महाबळेश्वर मधील पर्यटनस्थळे बंद असली तरी सोमवारपासून पर्यटकांना येथील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. महाबळेश्वर, मुंबई येथील कोरोना नियम शिथिल झाल्यामुळे अनेक जण सहलीसाठी वीकेंड सुट्टीत महाबळेश्वर, पाचगणी परिसरात येऊ लागले आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री व शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर या आपल्या कुटुंबीयासोबत काही दिवसांपासून महाबळेश्वर, पाचगणी परिसरातील एका बंगल्यामध्ये विश्रांतीसाठी मुक्कामी आलेल्या होत्या. त्यांच्याप्रमाणे अनेक सिने कलाकार या ठिकाणी येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत.

Leave a Comment