Mini Maldives | हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये अनेक लोक हे फिरायला जात असतात आणि सुट्टी एन्जॉय करत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जणांची आयुष्यात एकदा तरी परदेशात फिरण्याची नक्कीच इच्छा असते. आणि त्यासाठी अनेक लोक प्रयत्न देखील करत असतात. त्यातही आजकाल मालदीव हे लोकांचे प्रमुख आकर्षण बनलेले आहे. परंतु मालदीवचे (Mini Maldives) बजेट खूप जास्त असल्यामुळे अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु आता तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. कारण आता तुम्ही मिनी मालदीवला तुम्ही भेट देऊ शकता आणि येथील सगळा अनुभव तुम्ही भारतामध्ये घेऊ शकता. आता भारतातील हे मिनी मालदीव नक्की कुठे आहे? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
भारतातील मिनी मालदीव कुठे आहे ? | Mini Maldives
हे मिनी मालदीव उत्तराखंड मधील टीहरी धरणावर आहे. टिहरी धरण हे भारतातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक धरण आहे. या धरणामध्ये मालदीव चालू देण्यात आलेला आहे. येथील जलाशयामध्ये फ्लोटिंग हट्स, इको रूम्स बांधण्यात आलेल्या आहेत. जसेच्या पाण्यात मध्यभागी घरे बांधण्यात आलेली आहे. तसेच या तरंगणाऱ्या पाण्यावर देखील इथे घरे बांधण्यात आलेली आहे. या ठिकाणी जाऊन तुम्हाला मालदीवचा आनंद नक्की घेता येईल.
सध्या मिनी मालदीव हे पर्यटकांसाठी खास आकर्षण बनत आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य तसेच पाण्यातील मधोमध भागी राहण्याचा अनुभव लोकांना एक वेगळीच मजा देऊन जाते. तसेच तुम्ही येथे वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. पॅरासेलिंग इत्यादी गोष्टी जर तुम्ही आनंद घेऊ शकता. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक असतात.
मिनी मालदीवमध्ये राहण्याची सोय ?
मिनी मालदीव मध्ये तुम्ही फ्लोटिंग हाऊस देखील बुक करू शकता. हे तुम्ही सहज बुक करू शकता. यामध्ये राहण्यासाठी तुम्हाला साधारणपणे पाच ते सहा हजार रुपये एवढा खर्च येतो. यामध्ये तुम्हाला राहण्यासोबत खाण्याची देखील सोय मिळते. तसेच या ठिकाणी एका खोली दोन पेक्षा जास्त लोक राहू शकत नाही.
मिनी मालदीवला कसे जायचे ? | Mini Maldives
मिनी मालदीवला जाणे अगदी सोपे आहे. तुम्ही फ्लाईट रेल्वे किंवा कारने देखील जाऊ शकता. तुम्ही जर फ्लाईटने प्रवास करणार असेल तर देहरादून येथे विमानतळ आहे. तुम्ही तिथून टॅक्सीने टिहरी धरणावर जाऊ शकता. तसेच ऋषिकेश जवळ रेल्वे स्टेशन देखील आहे. या रेल्वे स्टेशन वरून तुम्ही बसने किंवा रिक्षाने या ठिकाणी जाऊ शकता. तसेच उत्तराखंडमध्ये विविध शहरातून बस सेवा देखील उपलब्ध आहे. तुम्ही बसने किंवा कारने प्रवास करून देखील या ठिकाणी जाऊ शकता.