उत्तरकाशी : वृत्तसंस्था – उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तरकाशीमध्ये यमनोत्री महामार्गावरील डामटा परिसराजवळ मोठा अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये तिर्थयात्रेसाठी निघालेली एक मिनीबस दरीत कोसळली आहे. या मिनीबसमध्ये 32 भाविक होते. या भाविकांपैकी बहुतेकांचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्याला सुरुवात केली.
पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झालेली असून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. आतापर्यंत 4 जखमींना रेस्क्यू करण्यात आलं आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह सापडले आहेत. इतर प्रवाशांचा शोध सुरु आहे. रात्रीच्यावेळी अंधार असल्याने रेस्क्यू ऑपरेशनसाठी अडचणी येत आहेत. या अपघातग्रस्त बसमध्ये मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील 29 नागरीक होते. चारधामसाठी जिल्ह्यातून दोन बस निघाल्या होत्या. यादरम्यान हा अपघात (Accident) घडला अशी माहिती जिल्ह्याचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे सहा दिवसांपूर्वीच उत्तरकाशीमध्ये घाटात मोठा अपघात (Accident) घडला होता. उत्तरकाशीच्या गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर अशीच एक गाडी दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला होता. तर 13 जण जखमी झाले होते. या अपघातातील जखमी आणि मृत पावलेले सर्व प्रवासी हे महाराष्ट्राच्या औरंगाबाद जि्ल्ह्यातील होते.
हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार
पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका