‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे; खडसेंनंतर मलाही ईडीची नोटीस येणार!’ ‘या’ मंत्र्याचे भाकीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘भाजपला बहुजनांचे राजकारण संपवायचे आहे. आज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना इडीची नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. बदल्याच्या राजकारणाचा पायंडा भाजपने पाडला आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे की कोणीही सत्तेचा मुकुट घेऊन आलेला नाही. जे पेराल ते उगवेल आणि त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी दिला. ( Vijay Wadettiwar )

ओबीसी समाजाच्या मेळाव्यासाठी विजय वडेट्टीवार नगरला आले आहेत. खडसे यांना आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) नोटिशी संबंधी प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजप हा मूळात भांडवलदारांचा पक्ष आहे. त्यांना फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचे हित जपायचे आहे. त्यांना अन्य घटकांशी काहीही देणेघेणे नाही. उलट राजकारणात बहुजनांना मोठे होऊ न देण्याचे त्यांचे धोरण आहे. जर कोणी मोठा होत असेल तर त्याची कोंडी केली जाते.’

‘आज एकनाथ खडसे यांना नोटीस आली, उद्या मलाही येऊ शकते. मात्र, आम्ही त्याला समोरे जाऊ. बदला घेण्याची वाईट प्रथा भाजपने राजकारणात आणली आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की येथे कोणीही सत्तेचा कायमस्वरूपी मुकुट घालून आलेले नाही. दिवस बदलत राहतात. जे पेराल ते उगवेल. नंतर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, हे लक्षात ठेवावे, असा इशाराही व़डेट्टीवार यांनी दिला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment