हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखाद्याला जर मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर त्यांना मुंबईत आणि महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. तसेच पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे असंही अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितलं
“मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची तुलना स्कॉलटंडशी होत असते. अतिशय सक्षमपणे मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस काम करत असतात. अशा परिस्थितीत एखाद्या कलाकाराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं हास्यास्पद आहे. आज मुंबई तसंच महाराष्ट्र पोलिसांच्या हाती मुंबईत सुरक्षित आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही ते सक्षम आहेत. जर मुंबई, महाराष्ट्र सुरक्षित नाही असं वाटत असेल तर त्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही,” असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
कंगणाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.तसेच मुंबई पोलिसांवर माझा विश्वास नाही असेही कंगणा म्हणाली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’




