व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनाप्रमुखांची शपथ, मी कोणतीही चूक केली नाही; अनिल परब ईडी कार्यालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. पहिल्या समन्स वेळी परब गैरहजर राहिले होते. आज मात्र ते ईडी कार्यालयात दाखल झाले असून यापूर्वी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही असं अनिल परब म्हणाले.

अनिल परब म्हणाले,मला आज ईडीचं तिसरं समन्स मिळालेलं असून मी आज चौकशीला सामोरं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन काम करतोय. मी आता चौकशीला जात आहे मात्र मला कोणत्या कारणासाठी चौकशीला बोलावलं जात आहे, हे माहिती नाही, असं अनिल परब म्हणाले.

ईडीची नोटीस नेमकी कशासाठी?

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांना ईडीने 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं

मोठे नेते ईडीच्या रडारावर; शिवसेना अडचणीत

दरम्यान, शिवसेनेचे बडे नेते ईडीच्या रडारावर असून शिवसेना अडचणीत सापडली आहे. भावना गवळी, आनंदराव अडसूळ आणि अनिल परब असे 3 मोठे नेते ईडीच्या कचाट्यात अडकले आहेत.