बाळासाहेब पाटलांनी विलासराव पाटील उंडाळकरांच्या निधनावर व्यक्त केल्या सहवेदना, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर काका यांचे आज निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. सातारा येथील हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. राज्याचे सहकार आणि पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही विलास काकांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, ”सातारा जिल्ह्यांमध्ये सर्वसामान्य घटकासाठी राजकारण करण्याची भूमिका घेऊन काकांनी राजकारणात पदार्पण केले. आणि शेवटपर्यंत त्यांनी ही भूमिका ठामपणे राबवली. कराड दक्षिण मतदार संघाचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिलं.  वाड्या-वस्त्यांवर जाऊन लोकांमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची प्रवृत्ती होती. त्यामुळं जिल्ह्यात आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एक चांगलं संघटन त्यांनी उभं केलं होत” असं पाटील यांनी सांगितलं.

बाळासाहेब पाटलांनी विलासराव पाटील उंडाळकरांच्या निधनावर व्यक्त केल्या सहवेदना, म्हणाले..

पाटील पुढे म्हणाले कि, ”त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारावर व त्या मतदार संघातील कार्यकर्त्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातून त्यांना सावरण्याची शक्ती देवो ही मी प्रार्थना करतो” अशा सहवेदना बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment