हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : राज्य सरकारला विश्वासात न घेता भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवैधानिक असून राज्याच्या स्वायत्तेवर घाला घालण्याचा प्रकार आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणाची SIT चौकशी करण्यासाठी खासदार शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. केंद्र सरकारने आज या प्रकरणाची तातडीने दखल घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे NIA कडे सोपवण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारला कळवला. केंद्र सरकारने अशा प्रकारे खेळी करत महाराष्ट्र सरकारला धक्का दिला. केंद्राच्या या निर्णयाचा बाळासाहेब थोरात यांनी निषेध व्यक्त केला आहे.
राज्य सरकारला विश्वासात न घेता भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय असंवैधानिक असून राज्याच्या स्वायत्तेवर घाला घालण्याचा प्रकार आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.@ANI @PTI_News @abpmajhatv @TV9Marathi @MiLOKMAT
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 24, 2020
भीमा कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादी सामील असल्याचा आरोप भाजप सरकारच्या काळात झाला आणि काही आरोपींना अटक देखील करण्यात आली. भाजपनेच हे भीमा कोरेगाव प्रकरण घडवून आणल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केलेला आहे. शरद पवारांनी पत्र लिहिल्यानंतर काहीच तासात केंद्र सरकारने हे प्रकरण NIA कडे सोपवत असल्याची माहिती राज्याला दिली त्यामुळे या प्रकरणी केंद्राची खेळी असल्याचे उघड आहे. या निमित्ताने केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष पुन्हा एकदा समोर येणार आहे.