संविधानाने तुम्हाला आगीत तेल घालून भडकवण्याचा अधिकार दिलेला नाही; वडेट्टीवारांचा फडणवीसांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काल भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. तसेच पालकमंत्री यशोमती ठाकूर व राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले असून फडणवीसांना टोला लगावला आहे. “देशाच्या संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. मात्र, ते काय आगीत तेल ओतायला व त्यातून भडकवायला दिलेले नाहीत, असे वडेट्टीवार यांनी टीका केली.

मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात पहिल्या दिवशी जो मोर्चा निघाला त्यात जास्त उकसान झाले नाही. मात्र, त्यानंतर झालेल्या मोर्चात नुकसान झाले. अमरावती, नाशिक या ठिकाणी घडलेल्या हिंसाचाऱ्याच्या घटनांचे व्हिडीओ आले आहेत. ज्या वेळी अशा स्वरूपाच्या हिंसाचाऱ्याच्या घटना घडतात. त्यावेळी सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन परिस्थिती कशा प्रकारे शांत होईल, याचा विचार करणे गरजेचे आहे.

वास्तविक पाहता रझा अकादमीने जो मोर्चा काढला. त्याला परवानगी नव्हती. तरीही मोर्चा काढला गेला. तेव्हा काही नुकसान झाले नाही. पहिल्या दिवशीच्या मोर्चानंतर पोलिसांनी कारवाई केली. कायदा आपला काम करीत असताना विरोधकांनी विनाकारण राजकारण करू नये. दंगे करून जनतेला भडकवून वातावरण दूषित करण्याचे काम करू नये. अशा प्रकारे आंदोलन पेटवून या राज्यावर राष्ट्रपती राजवटलागू करण्याचा मनसुभा काही राजकीय पक्षांचा असेल तर त्याला हे नक्कीच खतपाणी घालतील. आणि त्यांच्या मनात असेल तर ते नक्की करतील, असे मला वाटत असल्याचे वाटते, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले.

Leave a Comment