जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने महिला दिनाचे नियोजन करावे- हसन मुश्रीफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’ आणि जिल्हा परिषदेच्यावतीने येथील तपोवन मैदानावर सकाळी 11 ते 1 या वेळेत जागतिक महिला दिन होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले.

शासकीय विश्रामगृहातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी महिला जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी आज बैठक घेतली. या बैठकीला महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील, हंबीरराव पाटील, महिला व बाल विकास समिती सभापती पद्माराणी पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, 8 मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिन कार्यक्रमासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुरक्षित रित्या महिलांना आणणे आणि सुरक्षित रित्या त्यांच्या घरी पोहच करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथूनही महिला येणार आहेत. त्यांचे नियोजन करावे, सरपंच महिला, सदस्य महिला आणि बचत गटाच्या महिला आल्या पाहिजेत त्यासाठी सर्व पंचायत समिती सभापती आणि गट विकास अधिकारी यांनी नियोजन करावे. तालुका निहाय वाहनतळाचेही नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मित्तल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनीही यावेळी नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment