सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा इशारा पाटलांनी दिला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानांतर त्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज कोल्हापुरात आले आहे. दरम्यान, गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सोमय्या सध्या जे करीत आहेत. त्यामागचे कोणाचा तरी हात आहे. ते म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील होय. आम्हीच सगळं करायला सांगतो हे एकदा फडणवीस आणि पाटील यांनी उघडपणे सांगितले पाहिजे.

भाजपकडून सध्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणून त्यांची बदनामी करायची एवढंच काम सुरू आहे. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठीचच हे षडयंत्रं केले जात असल्याचीही शंका यावेळी पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.