गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त भागात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त छत्तीसगड सिमेस लागून असलेल्या गॅरापत्ती या गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देऊन तेथील पोलिसांच्या आणि दुर्गम नक्षलग्रस्त भागातील स्थानिक आदिवासी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई थेट पोहोचले. नक्षलवादी हल्ल्यामुळे नेहमी संवेदनशील असलेल्या गडचिरोली जिल्हयामध्ये शंभूराज देसाई यांनी ग्यारापत्ती येथील पोलीस आऊट पोस्टला जाऊन पोलिसांमार्फत राबविण्यात येणाऱ्या नाविण्यपूर्ण अशा दादालोरा खिडकी योजनेमधील विविध उपक्रमांची माहिती घेऊन आदिवासी बांधवांचे जनजागृती मेळाव्यास उपस्थिती दशर्वत या दुर्गम भागातील आदिवासी समाजाशी संवाद साधत त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन पोलीस विभागामार्फत मनोधैर्य वाढविण्याचा मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या प्रयत्न केला.

राज्यातील गडचिरोली या जिल्ह्याकडे नेहमीच संपूर्ण देशाचे लक्ष असते. कारण या जिल्ह्याला नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखले जाते. नक्षलवादी कारवाईंमुळे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये सोई सुविधांचा अभाव असल्याने अद्यापही मागासलेपणा असलेल्या आदिवासी समाजामध्ये मनोधैर्य वाढवत त्यांची प्रगती साधणे, विकासापासून वंचित समाजाचे हित जोपासणे हे या जिल्ह्यातील पोलीस खात्यापुढे नेहमीच एक आव्हान आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना या जिल्ह्यात पोहचवून त्या प्रभावीपणे राबविणे हे स्थानिक प्रशासनापुढे जिकरीचे काम असते.

गत महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या व छत्तीसगडच्या सीमा भागात गॅराबत्ती अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली कामांडोनी धडाकेबाज कारवाई करून 27 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. एवढेच नव्हे, तर जहाल नक्षलवाधी मिलिंद तेलतुंबडे या सर्वोच्च नेत्याचा खातमा ही याच ठिकाणी गडचिरोली पोलिसांनी केला होता. यासंदर्भात राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीच नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात गडचिरोली पोलीसांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव ही केला होता आणि योगायोग म्हणजे हेच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या पोलिसांच्या सुरक्षेविषयीची पाहणी करण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना नक्षलग्रस्त भागांत पोहचविण्यासाठी थेट गडचिरोलीला पोहोचले. या धाडसी दौऱ्यात मंत्री देसाई यांनी अतिदुर्गम विभागातील दादालोरा खिडीकी उपक्रमाची थेट ग्यारापत्ती येथे जावून प्रत्यक्ष केली पाहणी केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी या केवळ पाहणी दौराच केला नाही, तर या अतिसंवेदनशील भागातील दादालोरा महामेळाव्यात स्थानिकांशी संवाद साधत प्रमाणपत्र व साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागात शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी पोलीस विभागाने अनेक उपक्रम राबवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उत्कृष्ठ कार्य केले आहे. यामुळेच आता स्थानिक नागरिकांनी नक्षल विचार सारणी झुगारून त्यांना स्विकारलं असल्याचे मत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी गडचिरोली येथे व्यक्त केले.

एवढेच नव्हे तर मंत्री देसाई यांनी ग्यारापत्ती येथील आऊट पोस्टला जावून पोलीसांशी संवाद साधत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. तर गडचिरोली येथील मेळाव्यात ही मंत्री देसाई यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्थेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये चांगला समन्वय असल्याचे सांगून गडचिरोली पोलीस दलाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ही त्यांनी आपल्या दौऱ्यात आवर्जून उल्लेख केला.

Leave a Comment