तांबवेत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते यांत्रिक पध्दतीने भात लागण कार्यक्रमाचा शुभारंभ

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तांबवे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत यांत्रिक पध्दतीने भात लागण कार्यक्रमाचा गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. तांबवे येथील शेतकरी जंगम यांच्या शेतात राज्याचे अर्थ व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी कृषी सहाय्यक आबासाहेब कुंभार यांनी बीजप्रक्रीया, पर्यवेक्षकअशोक कोळेकर यांनी ॲमिनो ॲसिड तयार करणे व सुपरकेन नर्सरी, मेहमूद शेख यांनी यांत्रिकीकरण भात लागवड, विनोद पुजारी यांनी रोजगार हमी योजना व फळबाग लागवड याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

तांबवे येथे पार पडलेल्या कार्यक्रमास कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, जिल्हा कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तहसीलदार अमरदिप वाकडे, सरपंच शोभाताई शिंदे, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, हणमंतराव चव्हाण, अविनाश पाटील, लक्ष्मण देसाई यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी केले तर आभार ॲड. विजयसिंह पाटील यांनी मानले.