गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांना समोरासमोर येण्याचे आवाहन

ब्रेकिंग बातम्यांसाAShamburaj Desai & khotठी पहा - - 2021-05-21T205010.992
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

विधान परिषद सदस्य आणि भाजपाचे माजी कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची किव येते. राज्यमंत्री पद सांभाळलेल्यांनी अपुऱ्या माहितीचे आधारे बोलणे, शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही ठाकरे सरकारने दिली आहे. तेव्हा सदाभाऊ खोत महाविकास सरकारवर टीका करत आहे, तुम्ही केव्हाही समोरासमोर या आमची चर्चा करण्याची तयारी असल्याचे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, फयान वादळ, चक्रीवादळ असेल किंवा कसलेही संकट असले तरी त्यावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. शेतकऱ्यांना 22 हजार कोटी रूपयांचे कर्जमुक्तीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. याच्याउलट खतांचे दर कुणी वाढविले. खतांच्या वरील सबसिडी हा विषय केंद्राचा आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांला अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील सरकारने केले आहे.

सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना मदत देण्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका करून त्यांना पुतणा मावशीची उपमा दिली होती. या टीकेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. केंद्राने कि महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत केली यासाठी समोरासमोर येवून चर्चा करावी.