व्हेंटीलेटर, पीपीई किट, मास्क देणार नसल्याचे केंद्राकडून पत्र- आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मास्क, व्हेंटीलेटर आणि पीपीई किट देणार नाही असे केंद्राचे पत्र आले आहे. केंद्राने पूर्णतः पाठिंबा काढून घेणे योग्य नाही असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री आणि पंतप्रधानांना राज्य सरकार पत्र लिहिणार असल्याचेही टोपे म्हणाले.

जिल्हा बंदी उठवली, ई पास बंद केले, कार्यालयातील उपस्थित वाढवली आहे त्यामुळे संसर्ग वाढतोय असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय. मास्क घातला नाही तर दंड आहे, तरीही २५ ते ३० टक्के लोक मास्क वापरत नाहीत. एकट्या पुण्यात मास्क घातला नाही म्हणून आतापर्यंत १ कोटी दंड वसूल केल्याचेही ते म्हणाले. १५ सप्टेंबरपासून स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राबवली जाणार असल्याचे ते म्हणाले. यात ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जाणार आहे.

जशी संख्या वाढणार तसा ताण पडतो आणि बेड मिळत नाही. ज्यांना लक्षणं नाहीत अशा पॉझिटिव्ह रुग्णांनी घरीच राहिलं पाहिजे. ८० टक्के लोकांना लक्षणे नसतात,  त्यामुळे काळजी घ्यायला हवी असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’