पूजाच्या आई- वडिलांना संजय राठोडांनी 5 कोटी रूपये दिले म्हणून….; पूजाच्या चुलत आज्जीचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा चव्हाण हिची चुलत आज्जी शांता राठोड यांनी आता एक धक्कादायक आरोप केला आहे. पूजा चव्हाणच्या आई वडिलांना संजय राठोड यांनी ५ कोटी रुपये दिले. त्यामुळेच ते गप्प आहेत, असा गंभीर आरोप शांता राठोड यांनी केला आहे.

शांता राठोड म्हणाल्या, पूजाला न्याय मिळविण्यासाठी म्हणून पहिल्या दिवसांपासून आवाज उठविला आहे. मुख्यमंत्र्यासोबतही पूजाचे आई- वडिल खोट बोलत आहेत. स्वताःच्या मुलीच्या न्यायासाठी बोलत नाहीत, कारण संजय राठोडने त्यांना 5 कोटी रूपये दिले असल्याचा आरोप पूजा चव्हाणच्या चुलत आजी म्हणणार्‍या शांता राठोड यांनी केला आहे.

काल जो काही प्रकार मंत्रालयात झाला. पूजाचे आई- वडिल मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले तो प्रकार म्हणजे दडपण्याचा प्रयत्न आहे. ज्या आई- वडिलांनी स्वताः च्या लेकरांची पैशापोटी किंमत नाही, तर मग मी चुलत आजी कोण – कुठली? पूजाच्या आई- वडिलांनी समाजची दिशाभूल केलेली आहे, आता ते मुख्यमंत्र्यांचीही दिशाभूल करत आहेत असं त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या पूजाचे आई- वडिल सर्व खोट बोलत आहे, ते सत्य बोलत नाही. त्यांना संजय राठोड यांनी 5 कोटी रूपये दिले आहेत. पूजाला कधीच आई- वडिल चांगले म्हणणार नाहीत, ते तिला मेटलच म्हणणार. त्यांचा आवाज दबकाच निघणार सर्व पैसा घरातील जमिनित पुरून ठेवला आहे. जावा- जावात घरात भांडणे सुरू आहेत. 5 कोटी रूपये घरात गेला असून पैसा बोलत आहे, पूजाचे आई- वडिल बोलत नाही. तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी पूजाला न्याय मिळवून द्यावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

You might also like