पेट्रोल-डिझेलचे नियंत्रण केंद्राकडे ; दरवाढ तातडीने कमी करावी – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. देशातून मोदी सरकार वर रोष व्यक्त होत असतानाच राज्यातील ठाकरे सरकार मधील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पेट्रोल डिझेल दरवाढ केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असुन केंद्र सरकारने याबाबत लवकर निर्णय घेऊन दरवाढ कमी करावी अशी मागणी केली आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलच्या दराचे पूर्णपणे नियंत्रण हे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालया कडे आहे. यांच्यावरील दर निश्चित करण्याचे अधिकार पेट्रोलियम कंपनी कडे असले तरी पेट्रोलियम कंपन्या वरील नियंत्रण हे केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर निर्णय घेणे गरजेचे आहे आणि पेट्रोल दरवाढी मुळे जो असंतोष नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे त्याच्यावर केंद्राने तातडीने निर्णय घेऊन उपाय योजना कराव्यात अस शंभूराज देसाई म्हणाले.

दरम्यान जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होऊन देखील भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेल चे दराने 100 गाठली असल्याने सर्वसामान्य माणसाची चिंता मात्र नक्की वाढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’