राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर ; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणू ने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील मोठ्या मोठ्या शहरात कडक निर्बंध घातल्या नंतर देखील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का अशी भीती सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्याच दरम्यान आता राज्य पुन्हा एकदा लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे असं मोठं विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातली एकूण वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. शासन पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. उपाययोजना जरी सुरु असल्या तरी त्याचा रिझल्ट काय होईल, हे आज सांगता येत नसलं तरी महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे, असं आपल्याला म्हणता येईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं.

आताच्या स्थितीत लॉकडाऊन परवडणारं नाही, अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे पण रुग्ण वाढ होतीय, हे गंभीर आहे. राज्यातील काही शहरात कडक निर्बंध घ्यावे लागतील, असं सांगत लॉकडाऊनचा सूचक इशारा मंत्री वडेट्टीवार यांनी दिला आहे. मुंबई लोकलमध्ये गर्दी कशी कमी होईल याचा विचार सुरु आहे. तसंच मुंबई लोकलच्या फेऱ्या कमी करण्याबाबत विचार” असल्याची महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment