कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी, शिक्षणात 1 टक्के आरक्षण – मंत्री यशोमती ठाकूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या दृष्टीने राज्य सरकार कोकोनट महत्वाचे निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. या बैठकीत “कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आज राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.

राज्य सरकारच्या बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली. यावेळी मंत्री ठाकूर म्हणाल्या की, कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली होती. अनाथ मुलांना नोकरी, शिक्षणामध्ये 1 टक्का आरक्षण देण्याचा तसेच अनुसूचित जातींप्रमाणे वय, परीक्षा शुल्क, शिक्षणांतर्गत शिष्यवृत्ती, शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीमध्ये सवलत देण्याचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय हा अनाथांच्या जीवनात नवीन प्रकाश आणणारा ठरेल.

राज्याच्या दृष्टीने महत्वाचा हा निर्णय घेण्यात आला असून त्याला राज्यातील कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठीही एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे राज्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राबवली जाणार आहे. तर राज्यात महिलांसाठी ५० हॉस्टेल्स उभारली जाणार आहे. त्याचा महिलांना लाभ होणार असल्याचीही माहिती मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली.

Leave a Comment