पोलिसावर हात उगारणे भोवलं; मंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

0
75
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती । पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महिला-बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. याप्रकरणी मंत्री ठाकूर यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्तेही दोषी आहेत. अमरावती जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

८ वर्षांपूर्वी २४ मार्च २०१२ रोजी अमरावतीमधील अंबादेवी मंदिराजवळ यशोमती ठाकूर आणि पोलिसांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. दरम्यान, पोलिस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्यासोबत वाद घालून त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि शासकीय कामकाजात अडथळा आणणे, याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा न्यायालयाने यशोमती ठाकूर यांच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या प्रकरणामध्ये यशोमती ठाकूर यांचा कारचालक आमि त्यांच्यासोबत असलेले दोन कार्यकर्तेगी दोषी आढळले आहेत. त्याबरोबरच फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलीसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here