लडाखबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!! अमित शहांची घोषणा काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयने केंद्र शासित प्रदेश लडाखमध्ये (Ladakh) पाच नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या या जिल्ह्यांची नावे आहेत. यापूर्वी त्याठिकाणी लेह आणि कारगिल असे २ जिल्हे होते.

अमित शाह यांनी ट्विट करत म्हंटल, विकसित आणि समृद्ध लडाख तयार करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. त्यानुसार गृह मंत्रालयाने केंद्रशासित लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे असणार आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात प्रशासन बळकट केल्याने तळागाळातील अधिकाधिक लोकांना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. लडाखमधील लोकांसाठी संधी निर्माण करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे.

पंतप्रधान मोदींनी सुद्धा नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचे कौतुक केले आणि हे चांगले प्रशासन आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल असल्याचे म्हटले. आता या जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे सेवा आणि संधी लोकांच्या जवळ येतील असं मोदी म्हणाले. तसेच या घोषणेबद्दल पंतप्रधानांनी लडाखच्या जनतेचे अभिनंदन केले.

ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं होते. या कलमांतर्गत पूर्वीच्या आणि तत्कालीन जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा होता. मात्र हे कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. केंद्रशासित प्रदेश असल्याने लडाख केंद्रीय गृह मंत्रालयाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येतो.