सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! गृह मंत्रालयासह पंजाब अँड सिंध बँकेत भरती जाहीर; येथे करा अर्ज

0
1
Ministry of Home
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील तरुणांसाठी नोकरी संदर्भात एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सध्या गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) आणि पंजाब अँड सिंध बँकेत (Punjab and Sindh Bank) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 28 फेब्रुवारीच्या आत आपले अर्ज सादर करावेत. तसेच, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचावी.

गृह मंत्रालयात नोकरीची संधी

गृह मंत्रालयात इन्स्पेक्टर (एनिमी प्रॉपर्टी) या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना mha.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

वयोमर्यादा आणि पगार

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ५६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या वयाच्या मर्यादेपलीकडे असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना ग्रेड पे २८०० अंतर्गत ५२०० ते २०२०० रुपये वेतन मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज [email protected] आणि [email protected] या ई-मेल आयडीवर पाठवावा लागेल. या भरतीसंबंधी अधिक माहिती आणि सविस्तर अधिसूचना गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

पंजाब अँड सिंध बँकेतही भरती प्रक्रिया सुरू

गृह मंत्रालयाच्या भरतीप्रमाणेच पंजाब अँड सिंध बँकेत लोकल ऑफिसर या पदासाठीही मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ११० रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२५ पूर्वी आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या बँक भरतीसाठी पात्रता निकष, वेतनमान आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधीची सविस्तर माहिती पंजाब अँड सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.